|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जि. पं. निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविण्याचा काँग्रेसचा निर्णय: दिगंबर कामत

जि. पं. निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविण्याचा काँग्रेसचा निर्णय: दिगंबर कामत 

प्रतिनिधी/ पणजी

पुढील वर्षी राज्यात होणाऱया जिल्हा पंचायतीच्या निवडणुका काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय काल झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर देशभरातील मंदिबाबत राज्यात काँग्रेस पक्ष आंदोलन करणार असल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते दिगंबर कामत व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.

पुढील वर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्यात होणाऱया जिल्हा पंचायत निवडणुका पक्षाच्या ‘हात’ या चिन्हावर ढविण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाच्या उमेदवाराना पक्षाचे चिन्हे देण्याबाबत निवडणुक आयोगापाशी बोलणी करण्यात येणार आहे. जर वेगळे समान चिन्हे काँग्रेस उमेदवाराना देण्याचा विचार झाला तरीही आयोगाकडे बोलणी केली जाईल असेही दिगंबर कामत यांनी सांगितले.

मंदिविरोधात आंदोलन करणार

देशभरात सध्या मंदिचे वातावरण आहे. गोव्यातही मंदिचे वातावरण आहे. उद्योग, व्यापार क्षेत्रात मंदी आहे. त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रातही मंदिचे वातावरण आहे. त्यामुळे या मंदिविरोधात देशभरात आंदोलन करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाने त्याबाबत आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत. गोव्यात आंदोलन करण्यात आता 144 कलमाचा अडथळा निर्माण झाला आहे. सरकारने 30 दिवसांसाठी 144 कलम लागू केल्याने त्याचा परिणाम म्हापसा येथे आयोजित म्हादई जागावरही झाला आहे.

गोव्यात गरज नसताना 30 दिवसासाठी 144 कलम लागू करण्यात आले आहे. मुंबईसारख्या ठिकाणी आजही 144 कलम लागू केलेले नाही मग गोव्यातच का करण्यात आले. गोव्यातील जनतेचा व विरोधकांचा आवाज दाबण्याबाबत 144 कलम तब्बल 30 दिवसासाठी लागू केल्याचा आरोपही त्यानी केली. 144 कलम लागू करण्यासारखी गोव्यात स्थिती नाही. गोव्यातील 144 कलम मागे घ्यावी अशी मागणीही त्यानी केली आहे. गोव्यात लवकरंच काँग्रेस पक्ष ऍपबेज सदस्य नोंदणी सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.

म्हादईबाबत कोणतीही तडजोड नाही

म्हदईच्या विषयवर काँग्रेस पक्ष कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही व करू देणार नाही. म्हादईबाबत सर्वच गंभीर असल्याचे सांगतात. मात्र भलतेच करतात अशी टीकाही त्यानी केली. जे पत्र केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटकला दिले आहे ते बेकायदशीर आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात व लवादाकडे आहे. त्यामुळे हे पत्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मागे घ्यावे अशी मागणी कामत यांनी केली. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये आपलाही समावेश होता. जावडेकर यांनी सदरचे पत्र आपण दिले नसल्याचे स्पष्ट केले व गोव्यावर आपण अन्याय होऊ देणार नाही असेही सांगितले. दहा दिवसात निर्णय घेण्याचेही आश्वासन जावडेकर यांनी दिल्याचे कामत यांनी सांगितले.

नगरनियोजन कायद्यातील ‘16ब’ तरतुद मागे घ्यावी : चोडणकर

सुटकेस टु सुटकेस पद्धतीने केस टु केस निर्णय घेण्यासाठी केलेली ‘16ब’ ची तरतूत नगरनियोजन मंत्री बाबु कवळेकर यांनी मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली. विधानसभेत विरोधकाकडून विरोध होत असनाही नगरनियोजन कायद्यातील 16ब ची तरतूद संमत करण्यात आली. त्यावेळी तात्कालीन विरोधी पक्षनेते व सध्याचे नगरनियोजनमंत्री बाबु कवळेकर यांनी विरोध केला होता. व तात्कालीन मंत्री विजय सरदेसाई यांच्यावर सुटकेस टु सुटकेसचे आरोप केले होते. गोवा फॉरवर्डने त्यावेळी घेतलेला निर्णय आज बॅकवर्ड ठरला आहे. त्यावेळी काँग्रेसने लोकाना सावध केले होते. याचाही त्यानी उल्लेख केला. नु, सी. नलीनी या नाफ्तावाहू जहाचाच्या तज्ञाकडून तपासणी करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Related posts: