|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » साखळी पांडुरंग देवस्थानच्या पालखीची. पहिली ओटी भरण्याचा मान महाजनांचाच

साखळी पांडुरंग देवस्थानच्या पालखीची. पहिली ओटी भरण्याचा मान महाजनांचाच 

वाळपई प्रतिनिधी

 गोव्याचे पंढरपूर म्हणून गणल्या जाणाऱया कारापूर साखळी येथील पांडुरंग देवस्थानाच्या पारंपारिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज पालखी उत्सव एकादशीच्या शुभमुहूर्तावर मोठय़ा उत्साहात संपन्न झाला. महाजना दरम्यान पालखीची पहीली ओटी भरण्यावरून निर्माण झालेले मतभेद व त्यानंतर सदरचा वाद मामलेदार न्यायालयात न्यायप्रविष्ट पडल्यानंतर यासंदर्भात काही प्रमाणात वाद निर्माण झाला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी डिचोलीचे मामलेदार पंडित यांनी दिलेल्या निर्देशानुसार पालखीची पहिली महाजनांची मानाची ओटी महाजनांच्या सुवासिनी भरावी अशा प्रकारचा आदेश देण्यात आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात आली .यावेळी मोठय़ा संख्येने देवस्थानचे महाजन व कार्यकारी समितीचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

याबाबतची माहिती अशी की कारापूर साखळी येथील पांडुरंग देवस्थानाच्या एकूण परंपरेला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. गोव्यातील पंढरपूर असे मोठी ओळख निर्माण असलेल्या यादेवस्थानाच्या महाजनात काही प्रमाणात पालखी उत्सवातील ओटीभरणे यावरून वाद निर्माण झाला होता. या देवस्थानाच्या महाजन पैकी अपर्णादेवी राणे सरदेसाई यांनी पूर्व परंपरेप्रमाणे मानाची ओटी याच घराण्यातील विवाहित मुलींनी सर्वप्रथम भरावी अशाप्रकारची याचिका मामलेदाराकडे सादर करण्यात आली होती. त्यासंदर्भात वाद गेल्या मे महिन्यापासून न्यायप्रवि÷ बनला होता .

ओटी भरण्याचा सर्वप्रथम पहिला मान महाजन यांचाच

दरम्यान दोन दिवसांपूर्वी डिचोलीच्या मामलेदारांनी यासंदर्भात या वादावर तोडगा काढताना या देवस्थानाच्या महाजनातील महाजन यापैकी भरण्याचा पहिला मान हा त्यांचा असून यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुमत नसल्याचा निवाडा दिला आहे .यामुळे महाजनांच्यावतीने त्यांच्या सुहासिनी करावी मानाची ओटी भरता येईल अशा प्रकारचे आदेशात स्पष्ट करण्यात आल्यानंतर आज सकाळी महाजनांच्यावतीने सौ रुपाली रावसाहेब राणे कुडचिरे यांनी सर्वप्रथम महाजनांच्यावतीने  हा मान पार पडला. यावेळी डिचोलीचे मामलेदार श्री पंडित डिचोली पोलीस निरीक्षक संजय दळवी पोलीस बंदोबस्त व महाजन मोठय़ा संख्येने उपस्थित होते .पूर्णपणे धार्मिक पद्धतीने हा सोहळा पार पाडण्यात आला. यामुळे नागरिकांनी व महाजनांनी समाधान व्यक्त केले आहे. देवस्थानाची गोव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात असलेली आख्यायिका व या देवस्थानाच्या पारंपारिक व धार्मिक आख्यायिकाकेशी जडलेला भाविक वर्ग यांच्या एकूण भावनेनुसार या देवस्थानांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन सातत्याने भाविक वर्ग करीत आहे.

पालखीचा उत्सव दिमाखात साजरा.

 दरम्यान शेकडो वर्षांची परंपरा असलेला दशमीच्या पालखीचा उत्सव आज निमादिमाखात  साजरा करण्यात आला. यावेळी मोठय़ा संख्येने भाविक व महाजन उपस्थित होते. देवस्थानाची पालखी सदरीवर जाण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून रूढ झालेली आहे. तशाच प्रकारची प्रक्रिया यंदाही पार पडल्याची माहिती देवस्थान व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष उदयसिंग राणे यांनी सांगितले.

Related posts: