|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दोडामार्ग गोव्याला जोडण्याचा घाट

दोडामार्ग गोव्याला जोडण्याचा घाट 

प्रतिनिधी/पणजी

दोडामार्ग येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोठी जमीन विकत घेतल्याचा दावा गोवा फ्ढाŸर्वर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. गोमंतकीयांची पर्वा न करता सरकार दोडामार्गला गोव्यात जोडून घेणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, सरकार दोडामार्ग तालुका गोव्यात विलीन करु इच्छीत आहे. सरकारचा कल गोमंतकीयांकडे नकारात्मक आणि दोडामार्गकडे सकारात्मक असल्याचे दिसून येते.

सिकेरांच्या पुतळय़ाला सावंतांचा विरोध

त्यांनी पुढे सांगितले की, जॅक सिकेरा यांचा पुतळा फ्ढातोर्डा मतदारसंघात उभा करायला भाजप व काँग्रेसने एकत्र येऊन विरोध केला. विधानसभेत सिकेरांचा पुतळा उभारण्याची मागणी आपण केली होती परंतु तेव्हा सभपतीची परवानगी आवश्यक होती. तत्कालीन सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी परवानगी दिली नाही. आता ते मुख्यमंत्री असून आताही ते परवानगी देणार नाहीत, याची खात्री आम्हाला आहे, असेही ते म्हणाले.

आर्ले सर्कल ते रवींद्र भवन रस्त्याला माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यास सरकारचा विरोध आहेत तसेच हॉस्पिसिओ इस्पितळ आहे तेथील स्थानिक जागेला पाद्री मिरॅकल स्क्वेअर, सेंट जॉकी चर्च येथे त्या नावाचा रस्ता, साळगांवकर हाऊस ते सिद्धार्थ बुयाव यांच्या घरापर्यंत रस्त्याना उल्हास बुयाव यांचे नाव देण्यासही सरकारचा विरोध आहे, अशी माहितीही सरेदसाई यांनी दिली.

Related posts: