|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अजूनही ओला आहे, माणुसकीचा झरा

अजूनही ओला आहे, माणुसकीचा झरा 

बेळगाव  / प्रतिनिधी

वेळ दुपारी 12.30 ची… हैदराबादवरून आलेली रेल्वे स्थानकात आली आणि क्षणार्धात रेल्वे स्थानकात असलेली गर्दी आपोआप बाजूला सरकली. क्षणार्धात स्थानकासमोर असणारी रूग्णवाहिकेचा सायरन वाजवित वेगाने बाहेर पडली. रिक्षाचालकांनी वाहनचालकांना बाजूला सारत वाट मोकळी करून दिली. त्यामुळे काही कळण्याआतच ती रूग्णवाहिका रूग्णालयाकडे रवाना झाली. त्यामुळे अजूनही माणुसकीचा झरा ओला आहे याची प्रचिती शुक्रवारी आली.

एक ह्दयविकाराचा तीव्र झटका आलेला रूग्ण रेल्वेमधून बेळगावमध्ये आणण्यात आला. तो रूग्ण अत्यवस्थ स्थितीत असल्यामुळे कमी वेळेत रूग्णालयात घेवून जाणे गरजेचे होते. यासाठी रूग्णालयाची एक आयसीयु रूग्णवाहिका रेल्वेस्थानकात उभी होती. रेल्वे आली आणि स्थानकातून बाहेर पडणाऱयांची एकच गदी झाली.

परंतु या गर्दीतून सर्वजण एका बाजूला होवून त्या रूग्णाला रूग्णवाहिकेपर्यंत पोहचण्यासाठी मदत करीत होते. काही सेकंदाच्या आतच त्या रूग्णाला रूग्णवाहिकेत घालून हॉस्पीटलकडे रवाना करण्यात आले. याला रिक्षाचालकांची मोठी मदत झाली. त्या रूग्णाच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्यामुळे माणुसकीच्या नात्याने सर्वांना त्यांना मदत केल्याने रेल्वेस्थानक परिसरात एकच चर्चा होती.

 

Related posts: