|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » केवळ दैव बलवत्तर म्हणून रेल्वेतून पडूनही तो बचावला

केवळ दैव बलवत्तर म्हणून रेल्वेतून पडूनही तो बचावला 

जबलपूरच्या तरुणाची कहाणी, स्वतः चालत गाठले रेल्वे स्टेशन

प्रतिनिधी/ बेळगाव

देव तारी त्याला कोण मारी… याचा प्रत्यय गुरुवारी मध्यरात्री चिकोडी रोड, रेल्वे स्टेशनजवळ आला आहे. धावत्या एक्स्प्रेस रेल्वेतून पडूनही जबलपूरचा एक तरुण केवळ आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. दैव बलवत्तर म्हणून हा तरुण मोठय़ा संकटातून सुटला आहे. मध्यप्रदेशहून बेळगावला येताना ही घटना घडली आहे.

भरत चक्रवर्ती (वय 16, रा. उमरीयाजुआरी, जबलपूर, मध्यप्रदेश) असे त्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी मध्यरात्री रेल्वेतून पडल्यानंतर स्वतःला सावरत जखमी अवस्थेतही त्याने स्वतःच चालत रेल्वे स्टेशन गाठले आहे. सध्या त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असून त्याची प्रकृती धोक्मयाबाहेर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

भरत आपल्या हा आकाश व संतोष या आपल्या अन्य दोघा सहकाऱयांसोबत गोवा एक्स्प्रेसमधून बेळगावला येत होता. देसूरजवळ त्यांचे तात्पुरते वास्तव्य होते. रस्ता रुंदीकरणासाठीच्या पेवर्स तयार करणाऱया कामगारांचा एक संच मध्यप्रदेशमधून बेळगावला आला आहे. त्यांच्या सोबतच भरतनेही बेळगाव गाठले आहे.

भरतच्या आजीचे निधन झाल्यामुळे 5 ऑक्टोबर रोजी तो आपल्या गावी गेला होता. आजीचे क्रियाकर्म आटोपल्यानंतर पुन्हा कामावर येण्यासाठी तो 6 नोव्हेंबर रोजी अन्य दोघांसमवेत गोवा एक्स्प्रेसमध्ये चढला. गुरुवारी मध्य रात्री 1 वाजण्याच्या सुमारास चिकोडी रोड, रेल्वेस्थानकापासून 2 कि.मी. अंतरावर तो तोंड धुण्यासाठी बेशीनजवळ गेला. त्यावेळी तो झेपेत होता. तोंड धुताना तोल जाऊन तो रेल्वेतून पडला.

हा प्रकार लक्षात येताच त्याचा सहकारी आकाशने चेन खेचून रेल्वे थांबविली. रेल्वे सुरक्षा दलाचे धर्मवीरसिंग यादव हे या रेल्वेत कर्तव्यावर होते. त्यांनी चेन कोणी खेचली? हे पाहण्यासाठी आकाश व संतोष असलेल्या डब्यात पोहोचले. त्यावेळी त्यांनाही हा प्रकार समजला.

धर्मवीरसिंग व आकाश भरतला शोधण्यासाठी तेथेच खाली उतरले. त्यांनी चार ते पाच कि.मी. चालत जाऊन रेल्वे रुळाशेजारी भरतसाठी शोध घेतला. तो मिळाला नाही. रेल्वेतून पडल्यानंतर जखमी झालेला भारतने स्वतःला सावरत चालत येवून शुक्रवारी सकाळी चिकोडी रेल्वेस्थानक गाठले. रेल्वेच्या अधिकाऱयांनी त्याची अवस्था पाहून त्याच्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर त्याला बेळगावला हलविण्यात आले. 

Related posts: