|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हेरेअंग्रोळीत कौटुंबिक हिंसाचारातून पतीने पत्नीला पेटविले

हेरेअंग्रोळीत कौटुंबिक हिंसाचारातून पतीने पत्नीला पेटविले 

खानापूर तालुक्मयातील घटना, पत्नी गंभीर, पतीला अटक

खानापूर / वार्ताहर

खानापूर तालुक्मयातील हिरेअंग्रोळीत कौटूंबीक हिसांचारातून पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. या घटनेत सरस्वती जगदीश गोल्लीहळ्ळी (वय 31 ) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पती जगदीश चंद्राप्या गोल्लीहळ्ळी हा नेहमी पत्नीला त्रास देत होता. दोघात भांडण आल्याने पत्नीने माहेरी जाण्याचा पावित्रा घेतला त्यावेळी पतीने रागाने घरातील रॉकेल डबा घेऊन पत्नीच्या अंगावर ओतले व पेटवून दिले. याची खुनाचा प्रयत्न झाल्याची तक्रार विवाहितेच्या आईने पोलिसांत दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सरस्वतीचा नऊ वर्षांपूर्वी जगदीश याच्याशी विवाह झाला होता. सुरुवातीपासूनच माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावलेल्या जगदीशने गुरुवारी दुपारी सरस्वतीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. आगीचा भडका उडून भाजल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. यावेळी जीवाच्या आकांताने आरडाओरड केली. आवाज ऐकूण आलेल्या शेजाऱयांनी आग विझविली. पण, तोपर्यंत ती गंभीर जखमी झाली होती. तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. तिला एक मूलगा एक मूलगी आहे. पती जगदीश याच्याविरोधात मानसीक छळ व जिवे मारण्याच्या कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुरूवारपासून फरारी असलेल्या जगदीशला अटक करून कारागृहात रवाणगी करण्यात आली आहे. नंदगड ठाण्याच्या उपनिरीक्षक सुमा नाईक पूढील तपास करीत आहेत.

Related posts: