|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शेततळय़ात बुडून दोघांचा मृत्यू

शेततळय़ात बुडून दोघांचा मृत्यू 

अथणी तालुक्यातील देसाईहट्टीतील दुर्घटना

वार्ताहर/ अथणी

देसाईहट्टी (ता. अथणी) येथील शेततळय़ामध्ये पोहण्यास गेलेल्या मुलाला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या व्यक्तीसह दोघांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत समजलेली मातिही अशी, अभिषेक आवटी देसाईहट्टी (वय 9) हा मुलगा शेततळय़ात पोहण्यासाठी गेला. पोहत असताना तो पाण्यात गटांगळय़ा खाऊ लागला. नजीकच असलेल्या बिराप्पा विठ्ठल पडोलकर (वय 42) याला याची कल्पना येताच त्याने अभिषेकला वाचविण्यासाठी शेततळय़ात उडी घेतली. मात्र  अभिषेकला वाचविताना बिराप्पालाही पाण्यातून बाहेर पडता आले नाही. यात   दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

 या घटनेची माहिती मिळताच नजीकच्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. यानंतर दोन्ही मृतदेह शेततळय़ातून मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. बिराप्पा पडोलकर यांनी येथे शेतजमीन केली होती. येथे पाणी संग्रह करण्यासाठॅ शेततळे काढले होते. घटनास्थळी ऐगळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. उतरीय तपासणी करून नोतवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत ऐगळी पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. मृत अ†िभषेक हा तिसऱया इयत्तेमध्ये शिकत होता. त्याच्या पश्चात आई, बहिण असा परिवार आहे. तर बिराप्पा यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Related posts: