|Thursday, November 21, 2019
You are here: Home » Top News » एक डिसेंबरपासून फास्टॅगद्वारे होणार टोल वसूली

एक डिसेंबरपासून फास्टॅगद्वारे होणार टोल वसूली 

ऑनलाईन टीम / मुंबई :

येत्या 1 डिसेंबरपासून देशभरातील टोल नाक्यांवरील टोलचे पैसे फास्टॅगच्या माध्यमातून वसूल केले जाणार आहेत. केंद्रीय भूपष्ठ मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला टोलनाक्यांवरील सर्व मार्गिका या फास्टॅग मार्गिकांमध्ये रूपांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत.

फास्टॅग ही एक इलेक्ट्रॉनिक पद्धत असून, फास्टॅग वाहनांच्या दर्शनी भागास लावले जाणार आहे. गाडीवर फास्टॅग असल्यास देशभरातील टोल नाक्मयांवर कुठल्याही प्रकारे रोख पैसे न देता वाहन पुढे नेता येईल. यामध्ये असलेल्या रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन मार्फत संबंधित मालकाच्या बँक खात्यातून टोलची रक्कम कापली जाणार आहे.

त्यामुळे 1 डिसेंबरपासून टोलनाक्यांवरील वाहतूक कोंडी काहीशी कमी होणार आहे. मात्र, नवीन नियमानुसार रोखीने टोल देणाऱयांकडून दंडापोटी दुप्पट टोल वसूल केला जाण्याची शक्यता आहे.

एक डिसेंबरपासून लागू होणाऱया या प्रणालीचे वन नेशन वन फास्टॅग असे नामकरण करण्यात आले आहे. ही प्रणाली लागू झाल्यानंतर संपूर्ण देशभरात विना कॅश टोल वसूल केला जाईल.

Related posts: