|Thursday, November 21, 2019
You are here: Home » Top News » अयोध्याप्रकरणाचा निकाल देशवाशियांच्या भावनांचा आदर करणारा असेल : राऊत

अयोध्याप्रकरणाचा निकाल देशवाशियांच्या भावनांचा आदर करणारा असेल : राऊत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद जमीन वादप्रकरणावरील निकाल हा सर्वोच्च न्यायालयाचा असणार आहे, तो सरकारचा नसेल. त्यामुळे हा निकाल महत्त्वपूर्ण असून, तो निर्णय देशवाशियांनी मान्य केला पाहिजे. राममंदिराच्या जागेचा कोर्टाचा निर्णय हा सर्वांच्या भावनांचा आदर करणारा असेल असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

एका आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राऊत म्हणाले, अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशिद जमीन वादप्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात निकाल लागेल. हा निकाल देशवाशियांच्या भावनांचा आदर करणारा असेल. या प्रकरणात बाळासाहेब ठाकरे हे प्रमुख साक्षीदार होते. मागील दोन वर्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात दोन वेळा अयोध्येत रामजन्मभूमीवर जाता आले. तो विषय जिवंत ठेवण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला. त्यामुळे या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचेही महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे.

देशवाशियांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा असे आवाहन करत अयोध्येत राम मंदिर बनणारच, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

 

 

 

 

Related posts: