|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » अयोध्या : निकालानंतरही दोन पर्याय

अयोध्या : निकालानंतरही दोन पर्याय 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वादप्रकरणातील अंतिम निकाल काही वेळात लागणार असला तरी देखील काही कायदेशीर पर्याय आहेत. त्यामुळे या प्रकरणातील असंतुष्ट असणारा पक्ष 30 दिवसांच्या आत सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करू शकणार आहे.

राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वादप्रकरणावर सुप्रीम कोर्ट आज अंतिम निकाल देत आहे. तरी देखील या निकालामुळे असंतुष्ट झालेला पक्ष 30 दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका दाखल करु शकतात. या निकालावर एखाद्या पक्षाला काही हरकत असेल, तर सुप्रीम कोर्टात क्मयूरेटीव्ह पिटिशन देखील दाखल केली जाऊ शकते. क्मयूरेटीव्ह पिटिशन दाखल करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी मिळतो.

पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात काय त्रुटी आहेत, हे सुप्रीम कोर्टात सिद्ध करावे लागणार आहे. विशेष म्हणजे पुनर्विचार याचिकेदरम्यान वाद-प्रतिवाद केले जात नाहीत. पहिल्या दिवशी देण्यात आलेल्या निकालाच्या फायलींवर तसेच रेकॉर्ड्सवरच काय तो विचार केला जातो. त्यामुळे असंतुष्ट पक्ष पर्यांयाचा विचार करु शकतो.

Related posts: