|Thursday, November 14, 2019
You are here: Home » leadingnews » वादग्रस्त जागा रामलल्लांचीच : सुप्रीम कोर्ट

वादग्रस्त जागा रामलल्लांचीच : सुप्रीम कोर्ट 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद वादग्रस्त जागेचे केलेले त्रिभाजन अतार्किक आहे, असा निर्वाळा देत अयोध्येतील वाद्रग्रस्त जागा ही रामलल्लांचीच असून, मुस्लिमांना 5 एकर पर्यायी जागा द्यावी, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने एकमताने दिला आहे. तसेच लवकरात लवकर ट्रस्ट स्थापन करुन राम मंदिर उभारण्याच्या योजना सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

सुन्नी वक्फ बोर्डाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुस्लिमांना 5 एकर जागा देण्यात येणार आहे. सरकारकडून राम मंदिर ट्रस्ट स्थापन करुन तीन महिन्यांमध्ये राम मंदिर उभारण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

इंग्रजांनी दोन्ही जागा वेगळ्या ठेवल्या होत्या. इंग्रजांच्या भूमिकेमुळे हिंदू-मुस्लिम वाद निर्माण झाला असून, 1856 पूर्वी हिंदूकडून या जागेवर पूजा करण्यात आली आहे. वादग्रस्त जागी मशिद घोषित करा, अशी मागणी सुन्नी बोर्डाने सुप्रीम कोर्टाकडे केली होती. त्यावर अयोध्येतील बाबरी मशिद ही रिकाम्या जागी बांधण्यात आली नसून, या मशिदीखाली हिंदू संरचना होती. त्यातील अवशेष व दगड हे इस्लामी पद्धतीशी नव्हे तर मंदिराशी साधर्म्य साधणारे होते, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. अयोध्या प्रकरणात एकमताने निर्णय देण्यात आला असून, सुन्नी वक्फ बोर्डाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

 

Related posts: