|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी 

ऑनलाईन टीम / पुणे :

अयोध्या येथील राम मंदिर व बाबरी मशीद प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज पुण्यातील दुपारच्या सत्रातील शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. तर सकाळच्या सत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांना सकाळी 10 वाजता घरी सोडून देण्यात आले आहे.

राम जन्मभूमीच्या खटल्याचा निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये वादग्रस्त जागा ही रामलल्लांचीच असून, मुस्लिमांना पर्यायी 5 एकर जागा देण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरी देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, ते सुरक्षित घरी परतावे, यासाठी शिक्षण विभागाने सुरक्षेची खबरदारी म्हणून सकाळी याबाबत सर्व शाळांना सुचना दिल्या.

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) गणपत मोरे म्हणाले, आज सकाळच्या सत्रातील शाळा भरल्या आहेत, पण 10 वाजता शाळांमधील विद्यार्थी घरी सोडून द्यावेत, अशा सूचना पुणे शहर व जिह्यातील सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. तर दुपारच्या सत्रातील शाळा बंद ठेवण्यास सांगितले आहे. यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा समावेश आहे.

Related posts: