|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहीद जवानावर अंत्यसंस्कार

शहीद जवानावर अंत्यसंस्कार 

बेळगाव / प्रतिनिधी

दहशतवाद्यांबरोबर  झालेल्या चकमकीत जम्मू- काश्मीर  मधील पुच्छ भागात उचगावचा तरुण जवान राहुल भैरु सुळगेकर हा शहीद झाला. जम्मू मधून शुक्रवारी दुपारी दोन वाजता पार्थिव श्रीनगर चंदिगढ  दिल्ली असा प्रवास करून आज बेंगलोर पर्यंत पोहोचले असून दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत सांबारा व यानंतर उचगावला रवाना होणार आहे त्यानंतर उचगाव गावातून अंत्ययात्रा निघणार आहे दरम्यान उचगावला ग्रामस्थांनी व युवकांनी स्वतः खर्च करून अंत्ययात्रेची तयारी केली आहे.

स्मशानभूमीमध्ये  मोठा मंडप घालण्यात आला असून गावातील अनेक संस्था, युवकांनी राहूलच्या नावाचे वेगवेगळे स्लोगन मधून बॅनर लावले आहेत. सुहासिनीनी रांगोळ्या रेखाटल्या असून रस्त्याच्या दुतर्फा चुना पट्ट्या घालण्यात आल्या आहेत भगव्या ध्वजांनी गाव भगवे झाले आहे. गावातील सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आले असून संपूर्ण गाव अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहे

स्वयंसेवक फौज तयार करण्यात आली असून अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांना शिस्तबद्ध ठेवण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली आहे

राहुल सुळगेकर यांच्या निवासस्थानी उचगाव परिसरातील पुरुष, महिला, युवक, युवती यांनी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत आहेत संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे

 

 

DP

Related posts: