|Thursday, November 14, 2019
You are here: Home » Top News » आज बाळासाहेब असते, त्यांना आनंद झाला असता : राज ठाकरे

आज बाळासाहेब असते, त्यांना आनंद झाला असता : राज ठाकरे 

 पुणे  / प्रतिनिधी : 

अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिला आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राम मंदिराचा आज निर्णय आला. हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब हवे होते, त्यांना मनापासून आनंद झाला असता.

राज ठाकरे म्हणाले, लवकरात लवकर राम मंदिर उभं राहावं हीच इच्छा आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अतिशय आनंद झाला. जे कारसेवकांनी बलिदान दिलं त्यांना न्याय मिळणार का? हा इतकी वर्ष प्रश्न होता तो आज निकाली लागला असं त्यांनी सांगितले.

 

Related posts: