|Thursday, February 20, 2020
You are here: Home » leadingnews » राम मंदिर उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा रोडमॅप

राम मंदिर उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा रोडमॅप 

प्रतिनिधी : नवी दिल्ली

अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या प्रश्नावर आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत राम मंदिर बांधण्याचे आदेश दिले. न्यायालयाने केंद्र सरकारला 3 महिन्यांच्या आत ‘बोर्ड ऑफ ट्रस्टीज’चे गठन करून वादग्रस्त जागा राम मंदिराच्या उभारणीसाठी देण्यास सांगितले. तसेच न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डालाही मशीद उभारण्यासाठी 5 एकर जागा देण्याचा आदेश सरकारला दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेवरील निर्मोही आखाड्याचा दावा नाकारला. मात्र, मंदिर उभारण्यासाठी बनवण्यात येणार्‍्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजमध्ये त्यांना योग्य प्रतिनिधित्व देण्याचे निर्देश दिले आहेत. मंदिर कसे बनवायचे याबाबत बोर्ड ऑफ ट्रस्टीज निर्णय घेणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी दिलेला निकाल नाकारताना जमिनीचे तीन भागात वाटप चुकीचे ठरवले. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांच्या 5 सदस्यीय पीठाने एकमुखाने हा निकाल दिला आहे.

Related posts: