|Friday, February 28, 2020
You are here: Home » Top News » ही लढाई हक्कासाठी, आम्हांला भीक नको : असदुद्दीन ओवैसी

ही लढाई हक्कासाठी, आम्हांला भीक नको : असदुद्दीन ओवैसी 

ऑनलाइन टीम / हैदराबाद : 

अयोध्येत 5 एकर जमीन मुस्लिमांना मशीदीसाठी देण्याचा निर्णय नकारायला हवा. आम्ही न्याय्य हक्कासाठी लढत होतो. अयोध्येतील वादग्रस्त जमीनीवर सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ही प्रतिक्रिया दिली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आपण आदर करतो. परंतु, 5 एकर जमीन मुस्लमि स्वतः अयोध्येत विकतही घेऊ शकतात. त्यामुळे, मशीदीसाठी या जमीनीची भीक नको असे ओवैसींनी स्पष्ट केले.

ओवैसी पुढे म्हणाले, मशीदीला इतरत्र 5 एकर जमीन द्यावी हा निकाल देण्यात आला, तो मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने नकारावा. कारण, आम्ही केवळ कायदेशीर हक्कासाठी लढत होतो. ही लढाई हक्कासाठी होती. आम्ही हक्कासाठी लढतोय. बाबरी मशीद पाडली गेली नसती, तर न्यायालयानं आज काय निर्णय दिला असता? असा सवाल त्यांनी केला. हैदराबादेत मी एकटय़ाने भीक मागून निधी गोळा केला तरीही आम्ही सहज अयोध्येत 5 एकर जमीन घेऊ शकतो.

या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका दाखल करण्याचा विचार मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड करत आहे. त्यांच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे, असंही ओवेसी यावेळी म्हणाले.

 

 

Related posts: