|Thursday, November 14, 2019
You are here: Home » Top News » निकालाचा आदर करा आणि संयम राखा : शरद पवार

निकालाचा आदर करा आणि संयम राखा : शरद पवार 

बहुमत आहे, लवकर सरकार स्थापन करा : पवारांचा पुनरुच्चार

ऑनलाइन टीम / मुंबई : 

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले, या निकालाचा सर्वांनी आदर करावा आणि संयम राखावा. तसेच, देशात शांतता आणि बंधुभाव वाढेल याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

अयोध्या प्रकरणी निकाल देताना सुप्रीम कोर्टाने समाजाच्या सर्व वर्गांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने विचार केला ही खूपच चांगली गोष्ट असल्याचे पवार म्हणाले. अयोध्या प्रकरणी हा ऐतिहासिक निर्णय आला असून या निर्णयाचा सर्व वर्गातील लोकांनी सन्मान करायला पाहिजे, असे आवाहन त्यांनी लोकांना केले.

दरम्यान, राज्यातल्या परिस्थितीबद्दल विचारलं असता शरद पवार म्हणाले, पुन्हा एकदा सांगतो… बहुमत आहे त्यांनी सरकार बनवावं. युतीला जनतेनं कौल दिला आहे. आम्ही विरोधी बाकावर बसून काम करत राहू या आपल्या भूमिकेचा पवार यांनी पुनरुच्चार केला

 

 

Related posts: