|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Agriculture » कर्नाटक सरकारने ऊसबंदी उठवावी : राजू शेट्टी

कर्नाटक सरकारने ऊसबंदी उठवावी : राजू शेट्टी 

प्रतिनिधी / कोल्हापूर

यंदा महापूर, परतिच्या पावसामुळे ऊस शेतीचे नुकसान झाले. उत्पादन घटनार या भीतीने कर्नाटक सरकारने महाराष्ट्रात ऊसबंदी केली आहे. सरकारचे हे धोरण शेतकऱयांवर अन्याय करणारे आहे. सरकारला शेतकऱयांचा हक्क हिरावून घेण्याचा अधिकार नाही. कर्नाटक सरकारने ऊसबंदी तात्काळ उठवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

यंदा उसाचा सरासरी उतारा घटणार असून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेला चांगला दर असल्याने शेतकऱयांना एफआरपीपेक्षा जादा दर देणे कारखानादारांना शक्य आहे. तो किती मिळाला पाहिजे हे 23 नोव्हेंबरच्या ऊस परिषदेत ठरवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राजू शेट्टी म्हणाले, यंदा एफआरपीत कोणतीही वाढ झालेली नाही. गतवर्षी प्रमाणेच टनाला 200 रुपये मिळणार आहेत. मात्र एफआरपीचा बेस साडेनऊ वरुन दहा टक्के केल्याने 85 रुपये कमी मिळाले. यंदाही तीच परिस्थिती शेतकऱयांची आहे. पहिल्यांदा दुष्काळ आणि त्यानंतर महापूर, परतिच्या पावसाने शेतकऱयांचे नुकसान झाले आहे. योग्य पद्धतीने पंचनामे झालेले नाहीत. कर्जमाफी मिळालेली नाही. 33 टक्के जरी नुकसान झाले तरी ते 100 टक्के समजून नुकसान भरपाई द्यावी, असे एनडीआरएफच्या शिफारसी सांगतात तरीही सरकार काही करायला तयार नाही. सरकार कोणाचेही असो शेतकरी हितासाठी संघटनेचा लढा आहे. 23 नोव्हेंबरच्या ऊस परिषदेत या सर्व बाबींवर चर्चा होणार आहे.

13 नोव्हेंबरला शेतकरी नेते काश्मीरमध्ये

यंदा काश्मीरमध्ये सफरचंदाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. 20 लाख टन सफरचंद सडत आहे. मात्र तेथील सरकार काहाही हालचाल करायला तयार नाही. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशातील शेतकरी नेत्यांचे शिष्टमंडळ 13 नोव्हेंबरला काश्मीर दौऱयावर जाणार आहे. तशी पूर्व कल्पना राज्यपालांना देण्यात आली आहे. सफरचंद खरेदी केंद्रे सुरु करावीत अतिवृर्ष्टीच्या धर्तीवर शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी करीत तुम्ही एकटे नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत. असा संदेश शेतकऱयांना देण्यासाठी या दौऱयाचे आयोजन केल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

Related posts: