|Thursday, November 14, 2019
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » तयार घर घेण्याचे फायदे

तयार घर घेण्याचे फायदे 

अलीकडच्या काही वर्षात नव्या प्रकल्पांच्या उभारणीत म्हणावा तसा बिल्डरांनी रस घेतलेला दिसला नाही. एकंदर मागणीत आलेली घट पाहून बिल्डरांनी प्रकल्पांबाबत सावध भूमिका घेतली आहे. दुसरीकडे काही प्रकल्प व्यावसायिकांना मात्र घरांसाठी चांगला प्रतिसाद मिळतो आहे. डीएलएफच्या एका गुरगावमधील प्रकल्पाच्या लाँचिंगच्या पहिल्या दिवशीच 75 टक्के इतके फ्लॅटस् विक्री झाले. याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. अशाप्रकारे पहिल्याच दिवशी एवढय़ा संख्येने फ्लॅट बुक होण्याची ही बहुतेक पहिलीच घटना असावी. पण असे कसे झाले याचा मागोवा घेतला तेंव्हा समजलं की डीएलएफच्या प्रकल्पातील घरे ही तयार स्वरूपाची (रेडि-टू-मूव्ह इन) होती. याचाच अर्थ खरेदीदारांचा कल हा तयार फ्लॅटस्कडे अधिक आहे, हे स्पष्ट आहे. हे जरी गुरगावमधील उदाहरण असलं तरी सर्वच शहरात प्रकल्पांचा विचार केल्यास तयार घरांची मागणी अधिक आहे, असे दिसते. असे घर घेण्याचे फायदेही अनेक आहेत, हेही येथे विसरून चालणारं नाही. एक म्हणजे या घरांवर जीएसटी आकारला जात नाही. तेव्हा आपले तेवढे पैसे वाचतात. तेव्हा रेडी-टू-मूव्ह इन घरांची सध्या चलती आहे हे नक्की. अशा प्रकारच्या घरांना भविष्यात चांगली मागणी दिसून येईल. ऑक्टोबर 2019 ते डिसेंबर 2020 पर्यंतच्या कालावधीत 7 लाख 95 हजार घरे पुर्णत्वाला येतील.

घर विक्रीत वाढीने उत्साह

2015 मध्ये घर विक्री 4 टक्के इतकी घटली होती. पण नंतर 2016 मध्ये मात्र विक्रीत सुधारणा दिसून आल्या. काहीसा मंदावलेला घर विक्रीचा वेग पुन्हा गती घेण्याच्या दिशेने सावरू लागला. याने बिल्डरांना नवसंजिवनी मिळाली. 2015 च्या तुलनेत 2016 मध्ये 1 टक्का वाढ झाली. सध्याच्या स्थितीत काही शहरांनी नोटाबंदीच्या पूर्वीइतकी विक्री नोंद केली आहे. म्हणजे बांधकाम व्यवसाय पुन्हा गती घेताना दिसतोय, असे म्हणायला जागा आहे. सध्याच्या सरकारने गेल्या 2 वर्षाच्या कालावधीत काही उपयुक्त धोरणे लागू केली असून त्यासाठी बांधकाम व्यावसायिक स्वत:ला तयार करत आहेत, असे सांगितले जात आहे. एकंदर पाहिल्यास पुढचे वर्ष हे बांधकाम क्षेत्राला चांगलं जाईल, असे तज्ञांना वाटते आहे.

सध्याला विक्रीचा अंदाज बघितला तर 2016 च्या तुलनेत तसा कमीच आहे. पण मुंबई, हैदराबाद आणि पुणे शहरांनी मात्र घर विक्रीत त्यावर्षापासून वाढच दर्शवली आहे. मुंबईत घर विक्री या वर्षी पहिल्या तीन तिमाहीत 2016 च्या तुलनेत 23 टक्के अधिक असल्याचे दिसून आले आहे. 23 टक्के वाढ म्हणजे खरोखरंच चांगली गोष्ट म्हणायला हवी. बांधकाम क्षेत्रातील स्थिती सुधारत असल्याचे हे संकेत म्हणायला हरकत नाही. पुणे व हैदराबाद शहरांची विक्री 8.3 टक्के व 74 टक्के अनुक्रमे वाढलेली आहे. कोलकाता, एनसीआर-दिल्ली शहरांनी 2016 च्या तुलनेत यावर्षी विक्रीत अनुक्रमे 35, 26 टक्के घट नोंदवली. बेंगळूर आणि चेन्नई शहरांनी यावर्षी 2016 च्या तुलनेएवढीच विक्री दर्शवली आहे.

नोटबंदीनंतर 6 ते 8 महिन्यात रेरा व जीएसटी लागू केल्याने ही धोरणे बांधकाम क्षेत्राला उपयुक्त ठरली. त्याने व्यवहारात पारदर्शकता परतली. याचा आधार घेऊन अनेक बिल्डरांनी आपल्या प्रकल्पांमध्ये आवश्यक ते बदलही केले. आपल्या व्यवसायातील बदलासाठी वेळ लागल्याने 2017 च्या पहिल्या 9 महिन्यात विक्रीवर परिणाम दिसून आला आणि तो नकारात्मक होता. म्हणजेच विक्री 40 टक्के घटली. त्या काळात 72 हजार 300 घरांची विक्री झाली. 2016 मध्ये परिस्थिती सुधारतेय असे वाटत असताना पुन्हा 2017 मध्ये विक्रीने पाठ फिरवल्याने बिल्डरांच्या उत्साहावर विरजण पडलं. रहिवासी घरांच्या विक्रीने 7 वर्षे  घटीची सोबत करत नंतर वाढीच्या दिशेने झेपायला सुरूवात केली. धोरणात्मक सुधारणांच्या बलबुत्यावर बांधकाम क्षेत्राला नवी उभारी घेता येण्याची संधी प्राप्त होणार आहे.

व्यावसायिक गाळय़ांना येणाऱया काळात मागणी वाढणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांकडून अंदाज बांधले जात आहेत. व्यावसायिक गाळय़ांना मागणी वाढली तर याचा बांधकाम क्षेत्राच्या विकासावरही सकारात्मक परिणाम दिसून येईल. मागणी वाढीची दखल घेत काही बिल्डर्स मग कमर्शियल-कम-रेसिडेन्शीयल प्रकल्पांमध्ये रस घेऊ लागतील. पुढील 6 महिन्यात व्यावसायिक प्रकल्पांना चांगली मागणी असताना दिसेल, तेव्हा ही संधी काबीज करण्यासाठी बिल्डरांची लगबग वाढली तर नवल वाटायला नको.

Related posts: