|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » गायडन्स, कौन्सीलिंगसंबंधीचा डिप्लोमा

गायडन्स, कौन्सीलिंगसंबंधीचा डिप्लोमा 

एनसीइआरटीतर्फे शिक्षकांसाठी गायडन्स, कौन्सीलिंगसंबंधीत डिप्लोमा अभ्यासक्रम घेतला जाणार आहे. याकरीता इच्छुक पात्र उमेदवारांनी 15 नोव्हेबर 2019 पर्यंत अर्ज करायचा आहे.

आजच्या तणावपूर्ण वातावरणात मोठय़ांनाच नाही तर मुलांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. यात परीक्षेचे टेन्शन तर सर्वांनाच असतं. अशावेळी त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचे काम हे कौन्सीलर करत असतात. शिक्षण होण्याबरोबरच मुलांच्या समस्या समजून त्यांना पुढे योग्य दिशेने जाण्यासाठी मदत करायची इच्छा असल्यास याबाबतीतला गायडन्स अँड कौन्सीलिंगसंबंधीत डिप्लोमा करणे फायद्याचे ठरू शकते. हा डिप्लोमा एनसीइआरटीतर्फे घेतला जाणार आहे. याकरीता 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत इच्छुकांना अर्ज करता येतो.

सध्याच्या स्पर्धात युगात स्वत:ला तयार करण्याचे नियोजन विद्यार्थ्यांना करावं लागतं. त्यासाठी आवश्यक ते परिश्रम घ्यावे लागतात. आजच्या मुलांना चांगल्यात चांगले मार्क्स घ्यावे लागतात. तरच त्यांचा पुढे निभाव लागतो. काहीवेळा मुले अभ्यासाच्या अति तयारीमुळे तणावग्रस्तही होतात. अशावेळी त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. हे काम कौन्सीलर उत्तमपणे करू शकतो. नॅशनल कौन्सील ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीइआरटी) तर्फे शिक्षकांसाठी गायडन्स अँड कौन्सीलिंग विषयात डिप्लोमा अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम शिक्षक, एज्युकेटर, शाळा प्रशासक यांना अर्ज करता येतो. शिक्षकांनी पदवी व टीचिंगची पदवी घेतलेली असावी. जे शिकवत नाहीत पण पात्र पदवी आहे अशांनाही अर्ज करता येतो.

हा कोर्स 1 वर्षाचा असणार असून डिस्टन्स तसेच फेस-टू-फेस पद्धतीने घेतला जाणार आहे. इंग्रजी व हिंदी माध्यमाच्या भाषेत अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.

अभ्यासक्रमाचे शुल्क- सदर अभ्यासक्रमासाठी केंद्र सरकारी शिक्षकांसाठी 19 हजार 500 रुपये, राज्य सरकारी संस्थांमधील शिक्षकांसाठी 6 हजार रुपये तर खासगी संस्थांमधील शिक्षकांना 30 हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यासंबंधी सविस्तर संकेतस्थळाला भेट देऊन जाणुन घेता येईल.

अर्ज कधी कराल- इच्छुक पात्र उमेदवारांना आपला अर्ज 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत सादर करायचा आहे.

 अधिक माहितीसाठी वेबसाइट- https://www.ncert.nic.in

 

Related posts: