|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » leadingnews » राज्यपालांकडून भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण

राज्यपालांकडून भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण 

प्रतिनिधी / मुंबई

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे राज्यपालांनी निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 11 नोव्हेंबरला काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला कौल मिळाला असला तरी शिवसेना-भाजपमध्ये सत्तास्थापनेवरून मतभेद झाले आहेत. 9 नोव्हेंबरला तेराव्या विधानसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितले आहे.

राज्यपालांनी भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने पहिल्यांदा सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. याबाबतचे पत्र त्यांनी पाठविले असून पत्र मिळाल्यानंतर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होईल. यामध्ये निर्णय घेतला जाईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Related posts: