|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » रत्नागिरीच्या 31 वारकऱयांना विषबाधा

रत्नागिरीच्या 31 वारकऱयांना विषबाधा 

पंढरपूर / प्रतिनिधी

कर्तिकी यात्रेनिमित्त रत्नागिरी जिह्यातील संगमेश्वर येथून आलेल्या 31 भाविकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या सर्व भाविकांवर शनिवारी पहाटेपासून उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये बहुतांश रूग्णांची प्रकृति आता स्थिर आहे. तर अनेक वारकरी भक्तांना प्राथमिक उपचार देऊन रूग्णालयातून सोडून देण्यात आले आहे.

रत्नागिरी जिह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कर्जा कुंभारवाडी येथील सुमारे 60 ते 70 लोकांची एक दिंडी पंढरपूरच्या वारीसाठी आली. हे सर्व लोक येथील धुंडामहाराज मठ्ठा शेजारी इनामदार वाडय़ात वास्तव्यास होते. यावेळी त्यांनी उपवासाची खिचडी आणि भगर देखील स्वतः करून खाल्ली होती. यातूनच त्यांना विषबाधा झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे उपवासाचे पदार्थ करण्यासाठीचे सर्व आवश्यक पदार्थ देखील या भाविकांनी त्यांच्या गावाकडूनच आणले असल्याची माहिती सध्या पुढे येत आहे. हे अन्नग्रहण झाल्यानंतर शनिवारी पहाटे या वारकऱयांना उलटय़ा आणि जुलाबाचा त्रास झाला. यानंतर या सर्वांना तात्काळ उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाच्यावतीने या भाविकांजवळील अन्नाचे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

विषबाधा झालेल्या वारकऱयांमध्ये गोविंद दौलत लाले, प्रणाली प्रमोद गुरव, केशवदास दगडू मुंढेकर, प्रमोद सखाराम गुरव, सखाराम आत्माराम खानविलकर, समर्थ प्रमोद गुरव, प्रथमेश प्रमोद गुरव, अनुसया चंद्रकात साळवी, अस्मिता यशवंत खानविलकर, सत्यवती रघुनाथ साळवी, काशिनाथ तातू साळवी, सुमित्रा काशिनाथ साळवी, धोंडू गोपाळ हुंडेकर, सुनिल काशिनाथ खानविलकर, विजय शंकर जाधव, बाळू मोतीराम चव्हाण, सूर्यकांत चंद्रकात साळवी, सविता गोपाळ गुरव, शांताराम सडू खानविलकर, गोपाळ पांडुरंग व्हटकरे, नवनाथ पांडुरंग साळची, अमय सुरेश साळवी, कृष्णा लक्ष्मण काष्टे, सुरेखा सखाराम खाटेकर नर्मदा महादेव मुंढेकर, महेश रघुनाथ साळवी, सिताराम संभाजी सनगरे, सतीश संजय भागडे, शंकर विश्राम कलमडे, भाग्यलती बाळाराम साळवी, महादेश शिवराम गोथाडे यांचा समावेश आहे.  

या संपूर्ण घटनेतील रुग्णाची नुकतीच प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी पाहणी केली. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या सर्व रूग्णाला येथील उपजिल्हा रूग्णालयांच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.जयश्री ढवळे तसेच पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.धोत्रे यांनी तात्काळ उपचार केले.

Related posts: