|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सोलापुरात निकालाचे शांततेत स्वागत

सोलापुरात निकालाचे शांततेत स्वागत 

पोलिसांचा फौजफाटा: मंदिरासह मशिदींना पहारा

प्रतिनिधी/ सोलापूर

राम जन्मभूमी अयोध्या प्रकरणाच्या निकालाला सुरुवात होण्याच्या आधीच सोलापुरात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. शिवाय राम मंदिरांसह मशिदींना पोलिसांचा पहारा होता. या निकालाचे सोलापूरकरांनी शांततेत स्वागत केले.

सकाळी दहापासूनच निकालाची उत्सुकता लागली होती. यामुळे शहरातील महत्त्वाचे रस्ते निर्मनुष्य होते. बहुतांश जणांनी टी. व्ही. समोर बसूनच निकाल ऐकणे पसंद केले. पोलिसांनी करडी नजर ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. निकाल चालू असताना विजापूर वेस येथे नागरिकांना आपल्या छातीवर शांतीदूत असे बिल्ले लावून या निकालाचे स्वागत केले. नवी पेठेतील श्री राम मंदिरात हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी आरती करुन साखर वाटली. दरम्यान याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरती केल्यानंतर सर्वच कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या सल्ल्यानुसार तेथून निघूनही गेले.  सोलापूरकरांनी या निकाल्याचे शांतातेत स्वागत करुन आनंद साजरा केला.

Related posts: