|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » अन् एकतेचा संदेश देत हजारों रत्नागिरीकर धावले!

अन् एकतेचा संदेश देत हजारों रत्नागिरीकर धावले! 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

सुमारे 4 हजार रत्नागिरीकरांनी एकतेचा संदेश देत पोलीसांची कोस्टल मॅरेथॉन पूर्ण केली. लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी यामध्ये मोठा सहभाग नोंदवला. या मॅरेथॉनमध्ये 21 किमी पुरूष गटातून अविनाश पवार तर महिला गटातून शर्मिला कदम विजयाचे मानकरी ठरले. यासह 75 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक वसंत कर्लेकर यांनी 21 किमी अंतर पार करून तरूणाईसमोर एक चांगला आदर्श घालून दिला.

 रत्नागिरी जिल्हा पोलीसांकडून निरोगी आरोग्यांचा मंत्र आणि एकतेचा संदेश देण्यासाठी शनिवारी शहरातून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमधून देशाला एकतेचा संदेश देण्यात आला हिंदू-मुस्लिम समाजबांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. स्पर्धेचे ब्रीद वाक्यच ‘युनाटेड रत्नागिरी फॉर युनाटेड इंडिया’ असे ठेवण्यात आले होते रत्नागिरीत अशाप्रकारे पहिल्यांदाच ऐतिहासिक मॅरेथॉन झाली. या मॅरेथॉनचा शुभारंभ माजी एअर चिफ मार्शल हेमंत भागवत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश आनंद सामंत, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, बांधकाम विभाग अभियंता जयंत कुलकर्णी, अमृता मुंढे, आंतरराष्ट्रीय खेळाडू संपदा धोपटकर, ऐश्वर्या सावंत, अपेक्षा सुतार, आरती कांबळे, आकांक्षा कदम यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

रत्नागिरी कोस्टल मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केल्यावर सर्व स्पर्धकांसाठी नाश्ताची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे परिसरात कचरा झाला होता. ही बाब जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या लक्षात येताच त्यांनी सर्व स्पर्धकांना परिसर स्वच्छ करण्याचे आवाहन केले. हे अधिकारी इतक्यावर थांबले नाहीत तर त्यांनी स्वत: कचरा उचलण्यास सुरूवात  केली. त्यांचे अनुकरण करत सर्व स्पर्धकांनी क्षणात सर्व परिसर स्वच्छ केला.

कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेचा बक्षिस समारंभ उरकून गेल्यावर शेवटी आलेला एक स्पर्धक कौतुकास पात्र ठरला आहे. या स्पर्धकाने तरूणांना देखील लाजवले आहे. वसंत हरी कर्लेकर या 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तब्बल 21 किमी धावून स्पर्धा पूर्ण केली. या वयात देखील त्यांनी दाखवलेल्या उत्साहाबद्दल ते विशेष कौतुकास पात्र ठरले आहेत. बक्षिस समारंभ उरकल्यावर सुमारे अर्ध्या तासाने येणाऱया या ज्येष्ठ नागरिकाची पोलीस दलाने पुरेपूर काळजी घेत धावताना त्यांच्या सोबत एका गाडीची व पोलिसांची व्यवस्था ठेवण्यात आली होती.

तसेच मंडणगड घराडी अंध विद्यालयाचे प्रतिनिधींनीही ड्रीम रन पूर्ण केली या दोघांनी संपूर्ण रत्नागिरीकरांचे लक्ष वेधून घेतले मान्यवरांचे विशेष कौतूक केले.

यावेळी जाणीव फौंडेशन, रोटरी क्लब, रत्नदुर्ग मौंटेनियर्स, लायन्स क्लब, क्रीडा असोसिएशन, विरश्री ट्रस्ट, रत्नागिरी पत्रकार, जिद्दी मौटेंनियअर्स, क्रीडाई, मँगो इव्हेंट, अरिहंत ग्रुप, जेएसडब्लू, फिनोलेक्स, आयएमए, मुकुल माधव फौंडेशन, ओमसाई डेकोटेरेटर, जायंटस ग्रुप आदी विविध संस्थांसह नागरिकांचे मॅरेथॉनच्या यशस्वीतेसाठी सहकार्य मिळाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी यावेळी दिली.

मॅरेथॉनचा निकाल पुढीलप्रमाणे,

21 किमी धावणे- प्रथम क्रमांक अविनाश पवार, द्वितीय अक्षय पडवळ, रोहित बडदे, महिला गट- प्रथम शर्मिला कदम, द्वितीय  प्रिया शिंदे,

10 किमी पुरूष प्रथम क्रमांक मयुर चांदिवडे, द्वितीय सिध्देश भुवड, तृतीय क्रमांक सिध्देश कानसे

10 किमी महिला गट- प्रथम क्रमांक दिव्या भोरे, सिमा मोरे, दर्शना शिंदे

5 किमी पुरूष गट- प्रथम क्रमांक संकेत भुवड, सोहम पवार, प्रथमेश उदगे,

महिला- प्रथम क्रमांक रोहिणी पवार, द्वितीय श्रृती गिजबिले, विद्या चव्हाण

3 किमी मुले- प्रथम क्रमांक- रूद्र सदावते, द्वितीय किरण माळी, तृतीय श्रवण गवाणकर

3 किमी मुली- प्रथम क्रमांक स्वरांजली कर्लेकर, द्वितीय सानिका काळे, तृतीय त्रिशा मयेकर आदी स्पर्धकांनी या मॅरेथॉनवर विजयाची छाप उमटवली. या विजेत्यांना प्रमाणपत्र, मेडल आणि भेटवस्तू देवून गौरवण्यात आले.

 

Related posts: