|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लेंडी नाल्याच्या पाण्याने 300 एकरमधील जमीन खराब

लेंडी नाल्याच्या पाण्याने 300 एकरमधील जमीन खराब 

महापालिका-लघुपाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षाचा फटका

प्रतिनिधी/ बेळगाव

शहरातून जाणारा लेंडी नाला पावसाळय़ामध्ये दोन ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने फोडण्यात आला. त्यामुळे समर्थनगरपासून राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या जवळपास 250 ते 300 एकरमधील जमिनीमध्ये हे पाणी गेले. यामुळे ही जमीन पूर्णपणे खराब झाली आहे. या जमिनीमध्ये आता पीक घेणे कठीण जाणार आहे. तेव्हा शेतकऱयांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे.

यावषी अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरातील लेंडी नाला तुडुंब भरून वाहत होता. या नाल्यामध्ये डेनेज तसेच गटारींचे पाणी सोडले जाते. याचबरोबर ऍसिडमिश्रीत पाणीही सोडण्यात येते. त्यामुळे हे पाणी शिवारामध्ये गेले आहे. यामुळे समर्थनगरपासून राष्ट्रीय महामार्गापर्यंत आणि बळ्ळारी नाल्याच्या परिसरातील शिवारामधील बांध फुटले आहेत. हे ऍसिड व केमिकलमिश्रीत पाणी शिवारात गेल्यामुळे जमिनीचा पोत पूर्णपणे खराब झाला आहे. या जमिनीमधील पिके वाळून जात आहेत.

लेंडी नाल्याचे पाणी आताही शिवारामध्ये जात आहे. त्यामुळे ही संपूर्ण जमीन पाण्याखालीच आहे. तेव्हा लेंडी नाल्याची बांधणी करणे गरजेचे आहे. दोन ठिकाणी भगदाड पडली आहेत. ती बुजवावीत, अशी मागणी महानगरपालिकेकडे करण्यात आली. मात्र, त्यांनी लघुपाटबंधारे खात्याकडे बोट केले आहे. तरीदेखील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून एक दिवस जेसीबीने भगदाड बुजविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तरीही पाणी वाहतच आहे. तेव्हा महानगरपालिका आणि लघुपाटबंधारे खात्याने तातडीने या लेंडी नाल्याची साफसफाई करून शिवारात जाणारे पाणी थांबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या लेंडी नाल्यातून प्लास्टिक तसेच इतर कचरा मोठय़ा प्रमाणात वाहून जात आहे. तो कचरा शिवारात पसरत आहे. त्यामुळे शिवारातही कचऱयाचे साम्राज्य पसरले आहे. तेव्हा तातडीने जाणारे पाणी थांबवावे, अशी मागणी होत आहे.  

Related posts: