|Sunday, November 17, 2019
You are here: Home » leadingnews » शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्यावर काँग्रेस आमदारांचे एकमत

शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्यावर काँग्रेस आमदारांचे एकमत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्यास काँग्रेस आमदारांचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तवाहिनीने दिली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

जयपूरमध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची त्यांच्या आमदारांसोबत बैठक सुरू आहे. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस आमदारांचे एकमत झाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी जयपूरमधील एका हॉटेलमध्ये ही बैठक घेतली आहे. या बैठकीतील निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या बैठक होईल, त्यामध्ये याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे.

त्यामुळे लवकरच राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

 

Related posts: