|Friday, February 28, 2020
You are here: Home » Top News » भाजपसोबत सत्तास्थापन्यास शिवसेना आमदार अनुत्सूक

भाजपसोबत सत्तास्थापन्यास शिवसेना आमदार अनुत्सूक 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भाजपसोबत सत्ता स्थापन्यास शिवसेना आमदार अनुत्सुक असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

थोडय़ाच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या आमदांसोबत रिट्रीट हॉटेलमध्ये बैठक घेणार आहेत. त्यामध्ये याविषयावर सविस्तर चर्चा होणार आहे.

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने आमदार फोडाफोडीचे राजकारण होऊ नये, यासाठी शिवसेनेने आपल्या 40 आमदारांना रिट्रीट हॉटेलला वास्तव्यास ठेवले आहे.

जयपूरमध्ये सुरू असलेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीत शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस आमदारांचे एकमत झाले आहे. तर मुंबईत शिवसेना आमदार भाजपसोबत सत्तास्थापन्यास अनुत्सूक आहेत. मात्र, आघाडीसोबत सत्तास्थापन करण्यास शिवसेना आमदारांनी तयारी दर्शविल्याचे समजते.

Related posts: