|Sunday, November 17, 2019
You are here: Home » Top News » भाजपच्या कोअर कमिटीची चार वाजता पुन्हा बैठक

भाजपच्या कोअर कमिटीची चार वाजता पुन्हा बैठक 

ऑनलाईन टीम / मुंबई :

वर्षा बंगल्यावरील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली आहे. मात्र, पुन्हा एकदा दुपारी चार वाजता राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणावर चर्चा होईल, त्यानंतर सत्तास्थापनेबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांना कळविला जाईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर मुनगंटीवार यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली. मुनगंटीवार म्हणाले, राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणावर पुन्हा एकदा भाजपच्या कोअर कमिटीची चार वाजता बैठक होईल. त्यामध्ये जो निर्णय होईल, तो राज्यपालांना कळविण्यात येणार आहे, असे सांगत मुनगंटीवार तेथून बाहेर पडले.

Related posts: