|Friday, February 28, 2020
You are here: Home » leadingnews » भाजप नेते राज्यपालांच्या भेटीला

भाजप नेते राज्यपालांच्या भेटीला 

ऑनलाईन टीम : मुंबई

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निर्माण झालेला सत्तापेच कायम आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्ता स्थापन्यासाठी निमंत्रित केले. त्यानंतर आज (दि. 10) दिवसभर भाजपअंतर्गत बैठकांचे सत्र सुरू होते. शेवटी अमित शहा यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाल्यानंतर भाजप नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनाकडे रवाना झाले आहेत.

निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला असला तरी शिवसेनाभाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून बिनसले आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. शेवटी 9 नोव्हेंबरला तेराव्या विधानसभेची मुदत संपल्यानंतर राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले. त्यावर भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र पहिल्या बैठकीतून कोणताही निर्णय झाला नाही.

दुपारी 4 वाजता भाजप कोअर कमिटीची दुसरी बैठक झाली. या बैठकीला राज्यातील प्रमुख नेत्यांसह भाजप प्रभारी भूपेंद्र यादवही उपस्थित होते. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी बैठकीला थेट दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. तासभर चाललेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेते राजभवन येथे राज्यपालांच्या भेटीसाठी गेले आहेतत्यामुळे त्या ठिकाणीच भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार की विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेणार हे ठरणार आहे.

Related posts: