|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » leadingnews » भाजप सरकार स्थापन करू शकत नाही : चंद्रकांत पाटील

भाजप सरकार स्थापन करू शकत नाही : चंद्रकांत पाटील 

ऑनलाईन टीम मुंबई

महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला. मात्र शिवसेना सोबत येत नसल्याने आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही. शिवसेना सत्ता स्थापन करणार असेल तर त्यांना शुभेच्छा, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेला पेच कायम राहणार आहे.

भाजप नेत्यांनी राजभवनावर येऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर सत्ता स्थापन्याबाबत असमर्थता दर्शवली. सर्वात मोठा पक्ष असणार्‍या भाजपला शनिवारी राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले होते. त्यानंतर आज दिवसभर भाजप अंतर्गत खलबते झाली त्यानंतर विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतलायावेळी सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, आशिष शेलार, पंकजा मुंडे आदी नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील जनतेने भाजप, शिवसेना आणि महायुतीतील घटक पक्षांना जनादेश दिला. मात्र शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला, असा आरोप शिवसेनेवर केलातसेच काँग्रेसराष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन्यासाठी शिवसेनेला शुभेच्छा, असा टोला लगावला.

Related posts: