|Friday, February 28, 2020
You are here: Home » Top News » भाजपची असमर्थता; संजय राऊत ‘मातोश्री’वर

भाजपची असमर्थता; संजय राऊत ‘मातोश्री’वर 

ऑनलाईन टीम : मुंबई

राज्यातील सत्तेचा पेच वाढताना दिसत आहे. भाजपने सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागले असतानाच शिवसेना नेते संजय राऊत मातोश्रीवर दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेना काय भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे.

संजय राऊत मातोश्रीवर दाखल झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भाजपला निशाणा केले. जर भाजप सरकारच स्थापन करणार नसेल तर त्यांचा मुख्यमंत्री कसा बनेल? असा टोला त्यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरे यांनी येणार्‍या काळात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

भाजपने सत्ता स्थापन्यात असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे आता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकांकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे महाआघाडीसोबत शिवसेना असे सत्तेचे समीकरण जुळणार का? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

Related posts: