|Friday, February 28, 2020
You are here: Home » Top News » शिवसेनेने भाजपशी नातं तोडलं पाहिजे : नवाब मलिक

शिवसेनेने भाजपशी नातं तोडलं पाहिजे : नवाब मलिक 

ऑनलाईन टीम : मुंबई

भाजपने सत्ता स्थापन्यासाठी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे आता राज्यात महाआघाडीसोबत शिवसेनेचे सरकार सत्तेवर येणार का ? याबाबत उत्सुकता असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी शिवसेना पहिल्यांदा महायुतीतून बाहेर पडली पाहिजे आणि त्यानंतरच सत्ता स्थापनेबाबत चर्चा होईल आणि त्यावर निर्णय होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय नाट्य एका वेगळ्या वळणावर पोहोचल्याचे चित्र आहे.

दरम्यान, एकीकडे भाजपच्या बैठकांचे सत्र सुरू असतानाच काँग्रेस, राष्ट्रवादीतही पक्षांतर्गत बैठका सुरू होत्या. मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात खलबतं सुरु होती. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनीही अद्याप शिवसेनेकडून प्रस्ताव आला नाही. आमच्याकडे बहुमत नसल्याने आम्ही सरकार बनवणार नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही काँग्रेस विरोधात बसणार असल्याचे सांगितले. तसेच पाठिंब्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडकडे सोपवल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुढील राजकीय हालचालींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Related posts: