|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » डी. बी. पाटील यांना मरणोत्तर डी. लिट मिळावी : लालासाहेब गायकवाड

डी. बी. पाटील यांना मरणोत्तर डी. लिट मिळावी : लालासाहेब गायकवाड 

कोल्हापूर

     डी. बी. पाटील सरांचे प्रचंड योगदान लक्षात घेता त्यांना यापूर्वीच त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने डी.लिट ही पदवी देऊन सन्मानित करायला हवे होते, अशी समाजातील सर्वांची भावना आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मरणोत्तर डी.लिट ही मानाची पदवी द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व माजी फुटबॉल खेळाडू लालासाहेब गायकवाड यांनी केली आहे.

       त्यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याबद्दल ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार’, ‘श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा (संघटक/कार्यकर्ता) पुरस्कार’, महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट व गाईडच्या वतीने ‘मेडल ऑफ मेरीट’ असे राष्ट्र व राज्य पातळीवरील शासनाने आपणास सन्मानीत केले आहे. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर या संस्थेचे चेअरमन म्हणून त्यांनी सलग 14 वर्षे केलेले कार्य अव्दितीय आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान नव्या पिढीला निश्चितच प्रेरणादायक राहील. ज्ञानयोगी आणि कर्मयोगीच्या रूपानं आनंददायी शिक्षणाचं स्वप्न पाहताना एक द्रष्टा शिक्षणतज्ञ म्हणून महाराष्ट्राच्या समाजमनात डी. बी. पाटील सरांना सदैव आदराचं स्थान राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.

    ‘ज्या संस्थाचे संस्थात्मक जीवन भरभक्कम असतं, तोच समाज पराक्रम गाजवू शकतो.’ या राजर्षी शाहू महाराजांच्या विचारानुसार श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, शिवाजी पेठ, कोल्हापूर या संस्थेचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शी ठेवला व सर्व आर्थिक व्यवहार सचोटीने होतील याकडे लक्ष दिले, असेही ते म्हणाले.

Related posts: