|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिह्यात सव्वा लाख हेक्टरचे पंचनामे पूर्ण

जिह्यात सव्वा लाख हेक्टरचे पंचनामे पूर्ण 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची माहिती: अतिवृष्टीचा फटका, शेतकऱयांतून नुकसान भरपाईची मागणी

प्रतिनिधी/ सोलापूर

जिह्यात आतापर्यंत 1 लाख 8 हजार 378 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे झाले आहेत. उर्वरित 14 हजार 777 हेक्टर क्षेत्रावरील पंचनाम्याचे काम दोन दिवसात पूर्ण होईल. सोयाबीन, तूर, कांदा, द्राक्षे, डाळिंब या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

  नुकसानीबाबत जो अंदाज बांधण्यात आला होता. त्याचप्रमाणे हे काम पूर्ण करून घेण्यात आले आहे. 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान गृहीत धरून अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण प्रत्यक्ष पंचनाम्यावेळी सर्वच ठिकाणी जादा क्षेत्र दिसून आले आहे. त्याचबरोबर पहिल्यांदा जी पिके गृहीत धरण्यात आली होती. त्यापेक्षा इतर पिकांच्या नुकसानीची नोंद घेतल्याने क्षेत्र वाढले आहे. पंचनाम्याचे काम आणखीन सुरूच राहणार आहे. तसेच नुकसानीबाबत शेतकऱयांनी शेतीचे फोटो काढून शेतकरीही अर्ज करू शकतात. आणखी आठवडाभर सर्व आकडेवारीची खातरजमा करून शासनाला अहवाल पाठविला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे लवकर करुन नुकसान भरपाई वेळेत देण्याची मागणी जोर धरत आहे. 

         शेतकऱयांना अशी मदत मिळणार

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांबाबत ज्या शेतकऱयांनी विमा उतरविला आहे. त्या शेतकऱयांना विमा कंपनीने ठरविलेल्या निकषाप्रमाणे रक्कम दिली जाणार आहे. पण याची प्रक्रिया अजून सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून अहवाल गेल्यानंतर केंद्र शासन व विमा कंपनीचे पथक प्रत्यक्ष पाहणीसाठी येणार आहे. अहवालानंतर भरपाई मिळणार आहे. ज्या शेतकऱयांनी विमा उतरविला आहे. अशा शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून मदत करयाचा प्रस्ताव आहे. यापूर्वीच्या बैठकीत जिरायत शेतीला हेक्टरी 6 हजार 800 रू, बागायती शेतीला 13 हजार 500 तर फळबागेला 18 हजारांची मदत देण्यावर चर्चा झालेली आहे. 

 पंचनाम्यासाठी शेतकऱयांकडून पैसे मागितल्यास कारवाई

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची नोंद घेण्यासाठी शेतकऱयांना पैसे मागितल्याच्या तोंडी तक्रारी आल्या आहेत. याबाबत माझ्याकडे थेट तक्रार आल्यावर संबंधितांना तडकाफडकी निलंबित केले जाईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

Related posts: