|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » टेंडरच्या आमिषाने साडेसहा लाखांना गंडा

टेंडरच्या आमिषाने साडेसहा लाखांना गंडा 

दोन महिलांसह तीन जणांवर गुन्हा : दहा महिन्यानंतर पोलिसांत फिर्याद

प्रतिनिधी/ सांगली

रत्नागिरी येथे वनविभागाचे कंपाऊंडचे टेंडर देण्याचे आमिष दाखवत सांगलीवाडी येथील एका ठेकेदाराला तिघांनी तब्बल 6 लाख 40 हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. दहा महिन्यापूर्वी ही घटना घडली. याबाबत सतीश गजानन पवार (वय 32 रा. जुना समडोळी रस्ता, सांगलीवाडी, ता. मिरज) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार दोन महिलांसह तिघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र भास्कर लाळगे (रा. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा), सारिका रामचंद्र कंडे (रा. आय्यप्पा मंदिर, देवई ता. चंद्रपूर) व सुनिता रविंद्र लाळगे (रा. पंचशील अपार्टमेंट, सेक्टर 10, नेरुळ पश्चिम, नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, की सतीश पवार हे ठेकेदार आहेत. संशयितांनी त्यांना फॉरेस्ट कंपाऊंडचे टेंडर देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. पवार यांनी 26 ऑगष्ट 2018 ते 26 जून 2019 या कालावधीमध्ये विविध बँकाच्या एटीएममधून संशयितांच्या बँक खात्यावर 6 लाख 40 हजार रुपये भरले.

तरीही त्यांना टेंडर मिळाले नाही. याबाबत त्यांनी संशयितांच्याकडे वारंवार विचारणा केल. मात्र त्यांनी पवार यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. सातत्याने पाठपुरावा करुनही संशयित पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याचे लक्षात येताच पवार यांनी शनिवारी रात्री सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र लाळगे, सुनिता लळगे व सारिका कंडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शकुतंला वागलगावे या करीत आहेत.

 

Related posts: