|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » 18 रोजी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा

18 रोजी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा 

प्रतिनिधी / सांगली

जिह्यात परतीच्या पावसाने द्राक्ष बागा व शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे विशेषतः द्राक्ष बागायतदार कोलमडून पडला त्याचे पीक कर्ज माफ करावे, द्राक्ष पीक विम्याचे निकष बदलावेत यासह अन्य मागण्यासाठी सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिली

मोर्चाचे नेतृत्व माजी खा राजू शेट्टी हे करणार आहेत या मोर्चाला आ विश्वजित कदम,आ सुमनताई पाटील,युवा नेते विषालदादा पाटील उपस्थित राहणार आहेत. हा मोर्चा विश्राम बाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्या पासून सोमवारी दुपारी  1 वाजता प्रारंभ होईल तेथून तो जिल्हा अधिकारी कार्यालयावर जाईल

खराडे म्हणाले जिह्यात महापुरणे 75 ते 80 हजार हेक्टर वरील शेतीचे नुकसान झाले तर परतीच्या पावसाने दीड ते दोन लाख हेक्टर वरील शेती उध्वस्त झाली आहे यामध्ये द्राक्ष,सोयाबीन, मका ,ज्वारी,भाजीपाला आदींचा समावेश आहे यात 60 ते 65 हजार हेक्टर मधील द्राक्ष शेतीचा समावेश आहे दावण्या,फळकुज,करपा,मूळकूज,आदी रोगाने संपूर्ण द्राक्ष शेती उध्वस्त झाली आहे  अनेक द्राक्ष बागा त झाडावरच मुळ्या उगवून आल्या आहेत अती पावसामुळे हे संकट ओढवले आहे  त्यामुळे या द्राक्ष उत्पादक शेतकयांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे  औ शढ फवारण्या करून शेतकरी मेटा कुटीला आला आहे त्यामुळेच या शेतकयाचे किमान पीक कर्ज माफ करण्याशिवाय पर्याय नाही या शेतकयाचे पीक कर्ज माफ केले तरच हा शेतकरी टिकणार आहे महापूर ग्रस्त शेतकयाचे पीक कर्ज माफ केले त्याच धर्तीवर या शेतकयाचे पीक कर्ज माफ करावे ही मागणी आहे

याशिवाय द्राक्ष पीक विमा योजना ही फसवी आणि शेतकयांना लुटणारी आहे ही योजना शेतकरी हिताची नसून कंपनी हिताची आहे या योजनेच्या निकषामुळे शेतकयांना नुकसान भरपाई मिळत नाहीत त्यामुळे ही पीक विमा योजना बारा महिन्याची करावी, सर्व निकष बदलावेत, अशी मागणी आहे या हंगामात सर्व बागाचे नुकसान झाले आहे आणि 7 नोव्हेंबर नंतर पीक विमा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे या सर्व बाबी सरकारच्या निदर्शनास आणण्या करिता या मोर्चाचे आयोजन केले आहे तरी मोठय़ा प्रमाणात द्राक्ष उत्पादक, सोयाबीन, मका,ज्वारी व भाजीपाला उत्पादक शेतकयांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन खराडे यांनी केले आहे

 

Related posts: