|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » एस्टी विभागीय क्रिकेट स्पर्धेत सांगली विजयी

एस्टी विभागीय क्रिकेट स्पर्धेत सांगली विजयी 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व  कामगार कल्याण समिती रत्नागिरी विभाग आयोजित आंतर विभागीय टी 20 क्रिकेट स्पर्धा नुकत्याच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे झाल्या. अंतिम सामना सांगली विरुद्ध कोल्हापूर असा झाला. अटीतटीच्या सामन्यांमध्ये सांगली संघाने एक चेंडू व पाच फलंदाज राखून विजय संपादन केला. सांगली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर संघाने प्रथम फलंदाजी करताना विनायक कोळीने 4 षटकात 15 धावा देत 4, प्रमोद कोलेने 23 धावा देत 2, दिनेश मानेने 9 धावा देत 1 फलन्दाज बाद केले.  17. 5 षटकात सर्व बाद 86 धावा केल्या. यात प्रमोद समुद्रे यांनी 4 चौकारच्या मदतीने 36 धावा केल्या. सांगली संघाच्या गोलंदाजांनी 87 धावांचे लक्ष घेऊन उतरलेल्या सांगली संघाला कोल्हापूर संघाने चांगलेच झुंजवले.  या धावा करण्यासाठी सांगली संघाला 5 फलनदाज गमावून 19. 5 षटकांचा सामना करावा लागला. या मध्ये दिनेश मानेने 21 धावा, प्रमोद कोलेने 15 धावा, विशाल जाधवने 14 धावा व शेवटच्या दोन चेंडूत 3 धावांची गरज असताना षटकार मारणारा दीपक पाटील याने नाबाद 18 धावा केल्या. कोल्हापूर संघाकडून गोलंदाजी करताना गुरुदास डवरीने 14 धावात 2, जितेंद्र इंगवलेने 23 धावात 1, दीपक घारगेने 4 षटकात 1 निर्धाव षटक टाकत अवघ्या 6 धावा देत 2 फलनदाज बाद केले. कोल्हापूरच्या गोलंदाजी करताना 18 चेंडूत 10 धावा असे समीकरण असताना दीपक घारगेने निर्धाव षटक टाकले. 12 चेंडूत 10 धावा असताना राहुल कोळीने 3 धावा देत सामन्यात रंगत आणली. 6 चेंडूत 7 धावा असताना कोल्हापूरच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे हा अंतिम सामना गमवावा लागला. बक्षीस समारंभा वेळी विभाग नियंत्रक सुनील भोकरे, विभागीय कर्मचारी अधिकारी लक्ष्मीकांत गवारे, कामगार अधिकारी प्रवीण पाटील, लेखा अधिकारी तेजस नवले, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असो. सहसचिव दीपक देसाई, कोल्हापूर कामगार अधिकारी मनिषा पवार, महेश तोडणकर हे उपस्थित होते. या स्पर्धेला मुंबई, पुणे, धुळे, कोल्हापूर, सांगली, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद असे एकूण आठ संघानी सहभाग घेतला होता. हे सर्व सामने यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सुरक्षा अधिकारी उल्हास कदम, रत्नागिरी आगार व्यवस्थापक अजय मोरे, वाहतूक अधिकारी ए बी जाधव, प्रसाद मोहिते, राकेश चव्हाण, श्रद्धानंद सावन्त,  महेश सुवारे, विराज जाधव व अमित लांजेकर यांनी मेहनत घेतली.

Related posts: