|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » डय़ुटीवरील वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी एकास अटक

डय़ुटीवरील वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी एकास अटक 

प्रतिनिधी/ डिचोली

मुळगाव डिचोली येथील नागदेवता मंदिराजवळ वाहतूक नियम भंग करणाऱया वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी डय़?टी बजावणाऱया डिचोली वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक पुतुलो विठोबा गाड यांना शिविगाळ करीत मारहाण केल्याच्या आरोपाखाली डिचोली पोलिसांनी कांदोळकरवाडा नानोडा लाटंबार्से येथील संतोष यशवंत कुडचिरकर (वय 55) याला अटक केली आहे. सदर इसम मद्यपान करून वाहन चालवित असल्याबध्दल त्याला चलन देत त्याची दुचाकी ताब्यात घेण्यात आली होती.

उपलब्ध माहितीनुसार काल रविवारी(दि. 10) सकाळी 10.10 वा.च्या सुमारास डिचोली वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक पुतुलो गाड हे अन्य एक पोलीस कर्मचारी उज्वल हळर्णकर यांच्यासह नागदेवता मंदिराजवळ मुळगाव नानोडा या रस्त्यावर नो एंट्री रस्त्यावरून जाणाऱया वाहनचालकांना चलन देण्यासाठी डय़?टी बजावत होते. सुमारे 11.10  वा. जीए 04 के 7896 हि सुझुकी स्विस हि दुणाकी घेऊन मुळगाव येथून नानोडाच्या दिशेने जाण्यासाठी येणाऱया संतोष कुडचिरकर याला हेल्म?ट परिधान न केल्याबध्दल वाहतूक पोलीस गाडक्षव हळर्णकर यांनी अडविले व परवाना दाखविण्याची मागणी केली असता त्याने पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

    या बाचाबाचीवेळी त्याच्या तोंडातून दारूची दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांनी अल्क?मीटरच्या सहाय्याने त्याची चाचणी घेतली असता त्याने अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात मद्यपान केल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पोलिसांनी त्याची दुचाकी ताब्यात घेत या दुचाकी गाडीची कागदपत्रे आणण्यासाठी व सदर दुचाकी नेण्यासाठी कोणीतरी वाहन परवाना धारक व्यक्तीला बोलविण्याची त्याला विनंती केली. त्यावरही पोलिसांना शिवीगाळ करीत सदर संतोष कुडचिरकर हा कोणाकडून लिफ्ट घेऊन गेला.

   काही वेळानंतर कुडचिरकर हा पुन्हा त्याठिकाणी दाखल झाला आणि त्याने पुन्हा पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. या बाचाबाचीतुन त्याने सहाय्यक उपनिरीक्षक गाड यांच्या अंगावर हात घालत त्याचा गणवेश खेचला, नावपट्टी तोडली व छातीवर पंच मारला. तसेच हातात दगड घेऊनही हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता त्याला या ठिकाणी असलेल्या एकाने रोखले. हा प्रकार घडताच गाड यांनी या संपूर्ण घटनेची माहिती वाहतूक पोलीस निरिक्षक विजय राणे यांना दिली. त्यांनी लागलीच सदर माहिती डिचोली पोलीस स्थानकात दिल्यानंतर पोलीस वाहन घटनास्थळी दाखल झाले व संतोष कुडचिरकर याला ताब्यात घेतले.

   या प्रकरणाची रितसर तक्रार वाहतूक निरिक्षक विजय राणे यांनी डिचोली पोलीस स्थानकात नोंदविल्यानंतर संतोष कुडचिरकर याला पोलिसांनी अटक केली. 129, 130 (1) व वाहतूक कायद्याच्या 185 कलमान्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी डिचोली पोलीस उपनिरीक्षक दिपेश शेटकर निरिक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहे.

वाहतूक पोलिसांशी असभ्य वर्तन यापुढे खपवून घेतले जाणार नाही.

   या संदर्भात वाहतूक पोलीस निरिक्षक विजय राणे यांच्याशी संपर्क साधला असता, डिचोली वाहतूक पोलीस कर्तव्यपूर्ण आपले डय़?टी करण्याचे कर्तव्य पार पाडीत असून वाहतूक नियमांचा भंग करून उलट पोलिसांशीच गैरवर्तन किंवा अशा प्रकारची कृत्ये यापुढे खपवून घेतली जाणार नाही. त्याचे हे एक उदाहरण आहे. वाहतूक नियमांचे योग्यपणे पालक केल्यास कोणीही कोणावर विनाकारण कारवाई करणार नाही. वाहतूक नियंमभग करूनही पोलिशांची हुज्जत किंवा असभ्य वर्तन यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

 

Related posts: