|Friday, December 13, 2019
You are here: Home » Top News » ज्येष्ठ पत्रकार, लेखक रविकिरण साने यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार, लेखक रविकिरण साने यांचे निधन 

पुणे / प्रतिनिधी :

ज्येष्ठ पत्रकार, लेखक, रा. स्व. संघाचे माजी प्रचारक, जनसंपर्क क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व रविकिरण साने यांचे आज (सोमवार) सकाळी 7 च्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. ते 68 वर्षांचे होते.

मागील काही दिवसांपासून ते कर्करोगाशी त्यांनी झुंज देत होते. आज सकाळी 10 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गोमंतक, तरुण भारत, ऐक्य अशा विविध दैनिकातून त्यांनी पत्रकारिता केली. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे ते जनसंपर्क अधिकारीही होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे स्वीय सहायक म्हणूनही काम केले. ब्राह्मण मानस मासिकाच्या माध्यमातून त्यांनी ब्राह्मण चळवळीतही सक्रिय योगदान दिले.

 

 

Related posts: