|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ‘मसाप’चे माजी कार्यवाह ह.ल. निपुणगे यांचे निधन

‘मसाप’चे माजी कार्यवाह ह.ल. निपुणगे यांचे निधन 

पुणे / प्रतिनिधी :

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी प्रमुख कार्यवाह आणि पुष्पक प्रकाशनचे संचालक ह. ल. निपुणगे (वय 83) यांचे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. लेखिका शीला निपुणगे या त्यांच्या पत्नी होत.

निपुणगे 1999 ते 2011 या कालखंडात महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये होते. प्रारंभी कार्यवाह, कोशाध्यक्ष आणि नंतर प्रमुख कार्यवाह अशी पदे त्यांनी भूषविली. महाराष्ट्र साहित्य पत्रिका या मुखपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या प्रमुख कार्यवाहपदाच्या कार्यकालात पुण्यात झालेल्या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र साहित्य परिषदेला 82 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. पुष्पक प्रकाशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली. त्यांच्या संपादन कौशल्यामुळे ‘विशाखा’ दिवाळी अंकाला नावलौकिक संपादन झाला होता. आपला जीवनप्रवास त्यांनी ‘हल’चल या आत्मचरित्रातून शब्दबद्ध केला होता.  साहित्यिक ह. मो. मराठे यांनी संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती, त्यावेळी निपुणगे यांनी त्यांचे समर्थक म्हणून भूमिका बजावली होती.

 

Related posts: