|Friday, January 24, 2020
You are here: Home » leadingnews » विरोधी पक्षात बसणे हा भाजपचा अहंकार : संजय राऊत

विरोधी पक्षात बसणे हा भाजपचा अहंकार : संजय राऊत 

ऑनलाईन टीम / पुणे :

भाजपने विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घेणे हा त्यांचा अहंकार आहे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच भाजप शिववसेनेसोबत मोठे षढयंत्र रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

एका आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. राऊत म्हणाले, भाजप सत्ता स्थापन करण्यास असमर्थ ठरला आहे. त्याचे खापर शिवसेनेवर फोडून राज्यातील अस्थिरतेला जबाबदार धरणे चूकीचे आहे. भाजपने राज्यपालांना दिलेले निवेदन अतिशय खेदजनक आणि दुःखद होते.

विधानसभा निवडणुकीपूर्वी ठरलेल्या 50-50 फॉर्म्युल्याची अंमलबजावणी करण्यास भाजप तयार नाही. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यास तयार नाही. त्यामुळे राज्यात अस्थिर सरकार येण्यास भाजप जबाबदार आहे.

राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी भाजपला 72 तासांचा अवधी दिला होता. शिवसेनेला कमी वेळ देणे ही देखील एक राजकीय खेळी आहे. शिवसेनेचे केंद्रीय मंत्रिमंडळातील नेते आज राजीनामा देणार आहेत, असेही राऊत म्हणाले.

Related posts: