|Friday, December 6, 2019
You are here: Home » Top News » शिवसेनेचे अरविंद सावंत आज देणार राजीनामा

शिवसेनेचे अरविंद सावंत आज देणार राजीनामा 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज अरविंद सावंत केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.

शिवसेनेला राज्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा पाठिंबा हवा असेल, तर शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडावे, ही अट काँग्रेसने घातली होती. ही अट शिवसेनेने मान्य केल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या केंद्रातील मंत्र्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी याबाबत एक ट्विटही केले आहे. ‘शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोटय़ा वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का राहायचे?, असे सावंत यांनी ट्विट केले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचे सूत्र ठरले होते. दोन्ही पक्षांना हे सूत्र मान्य होते. आता हे सूत्रच नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक आहे, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. अरविंद सावंत आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्यामागची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Related posts: