|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बैठका सुरू

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बैठका सुरू 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवसेनेला पाठिंबा देण्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या एक तासांपासून बैठका सुरु आहेत.

महाराष्ट्रातील नेत्यांच्या आग्रहास्तव सोनिया गांधी यांची दिल्ली येथे कोअर कमिटीची बैठक सुरू आहे. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, यावर सोनिया गांधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधत आहेत. मात्र, काँग्रेसमध्ये या मुद्यावरुन दोन गट पडल्याचे समजते. मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल हे काँगेसच्या बैठकीला उपस्थित आहेत.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची मुंबईत वाय. बी. सेंटरमध्ये बैठक सुरू झाली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही पक्षाने कोणासोबत जावे हे सोपे नाही. यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत बैठकीनंतर स्पष्ट करु, सध्या आमचा कुठलाही निर्णय झालेला नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना सांगितले आहे.

तर सत्तास्थापनेच्या मुद्यावर राष्ट्रवादीची भूमिका केवळ नवाब मलिक मांडतील. इतर प्रवक्ते आणि नेत्यांना या मुद्यावर प्रसारमाध्यमांशी बोलण्यास बंदी घालण्यात आल्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत नुकताच घेण्यात आला आहे.

 

 

 

 

Related posts: