|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » ‘त्या’ पाच एकर जागेवर हॉस्पिटल उभारावे : जावेद अख्तर

‘त्या’ पाच एकर जागेवर हॉस्पिटल उभारावे : जावेद अख्तर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अयोध्येत ज्यांना पाच एकर जमीन मिळेल, त्यांनी त्या जागेवर एक मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल उभारावे, असे मत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

‘अयोध्येत ज्यांना पाच एकर जमीन मिळेल, त्यांनी त्या जागेवर एक चॅरिटेबल हॉस्पिटल उभारावे. त्यासाठी सर्व धर्मियांनी हातभार लावावा.’ असे ट्विट अख्तर यांनी केले आहे.

शनिवारी अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. त्यामध्ये अयोध्येतील वादग्रस्त जागा ही रामलल्लांचीच असून, मुस्लिमांना पाच एकर जमीन देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. त्यानंतर सेलिब्रिटींच्या अशा प्रकारच्या प्रतिक्रीया येत आहेत.

Related posts: