|Friday, January 24, 2020
You are here: Home » Top News » बीडमध्ये ट्रक-कार अपघातात 7 जण ठार, 3 जखमी

बीडमध्ये ट्रक-कार अपघातात 7 जण ठार, 3 जखमी 

ऑनलाइन टीम / बीड : 

मांजरसुंबा-पाटोदा रोडवरील वैद्यतकीन्ही जवळ ट्रक-बोलरोच्या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार झाले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सर्व मृत निवडुंगवाडी इथले रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही आज सकाळी घडली आहे.

या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृत पावलेल्यांमध्ये एका बालकाचा तसेच काही महिलांचीही समावेश आहे. बोलेरो पूर्णपणे दबल्यामुळे गाडीत आणखी मृतदेह आहेत का हे लक्षात येत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

 

Related posts: