|Friday, December 13, 2019
You are here: Home » leadingnews » काँग्रेस पक्षाचा निर्णय झाल्यावर राष्ट्रवादी निर्णय घेईल : नवाब मलिक

काँग्रेस पक्षाचा निर्णय झाल्यावर राष्ट्रवादी निर्णय घेईल : नवाब मलिक 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, काँग्रेस ने पुन्हा 4 वाजता बैठक घेण्याचे ठरवले आहे. काँग्रेसच्या निर्णयाची आम्ही वाट पाहत आहोत. त्यांनी निर्णय घेतल्यानंतरच राष्ट्रवादी निर्णय घेणार आहे.

मलिक म्हणाले, आम्ही काँग्रेससोबत एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यामुळे, शिवसेनेला समर्थन देण्यावर निर्णय देखील मिळूनच घेणार आहोत. संध्याकाळी 4.30 वाजता राष्ट्रवादीची आणखी एक बैठक होणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादी सुद्धा आपली भूमिका मांडणार आहे.

Related posts: