|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » Top News » अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा

अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सौपवला आहे. राज्यात युतीत वितुष्ट आलं आहे, अशा वातावरणात मंत्रिपदाचा कार्यभार हाती असणं मला योग्य वाटत नाही, त्यामुळे मी पदाचा राजीनामा देत आहे. असं अरविंद सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा-शिवसेना युतीचा फॉर्म्युला ठरला होता. मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला. अशा वातावरणात काम करणं शक्य नाही. त्यामुळं मी आपल्या केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे.

 

Related posts: