|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आजरा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रा. सुनील शिंत्रे

आजरा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रा. सुनील शिंत्रे 

आजरा/प्रतिनिधी

आजरा साखर कारखान्याच्या चेअरमनपदी प्रा. सुनील शिंत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. एस. एन. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली.

चेअरमनपदासाठी शिंत्रे यांचे नाव मुकुंदराव देसाई यांनी सुचविले त्यास वसंतराव धुरे यांनी अनुमोदन दिले. कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर शिंत्रे यांची निवड करण्यात आली. या बिनविरोध निवडीमुळे कारखान्यातील सत्ता संघर्षाला पूर्णविराम देण्यात आला.

Related posts: