|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » leadingnews » मुदत संपली; शिवसेना कोंडीत

मुदत संपली; शिवसेना कोंडीत 

ऑनलाईन टीम / मुंबई

राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सुटण्यासाठी अजूनही वाट पाहावी लागणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष असणार्‍या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी 24 तासांची मुदत दिली. मात्र शिवसेना दिलेल्या वेळेत सत्तास्थापन करू शकली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून पाठिंब्याबाबत पत्र न मिळाल्याने शिवसेना कोंडीत सापडली आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून पाठिंब्याचे पत्र न मिळाल्याने शिवसेनेने राज्यपालांकडे चर्चेसाठी मुदत वाढवून मागितली. मात्र ती मान्य होऊ शकली नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार की पुढील पक्षाला निमंत्रण मिळणार याबाबत उत्सुकता आहे.

Related posts: