|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » राज्यपालांचे राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण

राज्यपालांचे राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण 

ऑनलाईन टीम / मुंबई

शिवसेना दिलेल्या वेळेत सत्तास्थापनेचा दावा करू शकली नाही. त्यामुळे राज्यातील सत्ता पेच कायम असतानाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसेपाटील, धनंजय मुंडे आदी नेते राजभवनात दाखल झाले आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेळेत पाठिंबा न दिल्याने शिवसेना आपला सत्तास्थापनेचा दावा करू शकली नाही. तत्पूर्वी, सर्वात मोठा पक्ष असणार्‍या भाजपनेही सरकार स्थापन्यात असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष असणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसला बोलावले आहे. तसेच राष्ट्रवादीलाही शिवसेनेप्रमाणेच 24 तासांचा अवधी दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करणार की दुसरा कोणता निर्णय घेणार यावरून राज्याची पुढील राजकीय दिशा ठरणार आहे.

Related posts: